
वाळूजमहानगर, (ता.4) – शिवछत्रपती विद्यालय, बजाजनगर येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले. या आनंद नगरी मध्ये 1ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खरेदी विक्रीच्या अनुभवासह मनोरंजन व पाककला असा द्वि आनंद घेतला.
शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारले. शिवछत्रपती विद्यालयाचे उपाध्यक्ष जाधव सर आणि राजा शिवाजी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विद्या उगले यांनी प्रमुख पाहुणे या रुपात उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांना आरोग्यदायी भारतीय चविष्ठ व्यंजने कशा प्रकारे बनवावीत, त्यांचे सादरीकरण, मार्केटिंग, त्यांची विक्री व मुल्य निर्धारण कशा प्रकारे करावी. याची स्वअनुभूती व अंगीभूत कौशल्याचा विकास व्हावा. या अनुषंगाने आनंदगरीचे आयोजन शिवछत्रपती विद्यालयात करण्यात आले. ढोकळा, पाणीपुरी, फ्रुटी, चना-मसाला, साबुदाणा वडा, गुलाब जामून, मसाला ताक, इडली-सांबर, अननस स्लाईड, रगडा, ब्रेडवडा, चंपाकळी, भेळ, आदी पदार्थ विद्यार्थ्यांनी या आनंद नगरीत सादरीकरण व विक्री केली.
हा कार्यक्रमाया करिता विद्यालयातील शिक्षिका सारिका डोंगरे, अर्चना भागत, संध्या ढवळे, स्वाती शिरसाठ, सुरेखा राजमाने, पूनम शर्मा, रेवती तायडे, अश्विनी करंजे, नागेश कदम, अमोल चव्हाण, गणेश लोंढे आदींनी परिश्रम घेतले.
—————
