March 25, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – शहर व जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश असतानाही ते धुडकावून वडगाव (को.) येथे फिरत असताना 21 वर्षीय एका तरुणास वाळुज एमआयडीसी पोलिसांनी पकडून अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
अमोल जगन्नाथ गायकवाड (वय 21) रा. वडगाव (को.) छत्रपती संभाजीनगर यास पोलीस उपआयुक्त परीमंडळ 1, छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या आदेशानुसार हद्दपार छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा हद्दीतुन दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. तरीही तो कोणतीही परवानगी न घेता वाळूज एमआयडीसी हद्दीतील सलामपुरेनगर (को.) येथे फिरत होता. त्याला वाळुज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता.14) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पकडून जेरबंद केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *