March 19, 2026

वाळुज महानगर, (ता.14) – आदर्श गांव पाटोदा येथे सूचना कार्यालय व सूचना व प्रसारण मंत्रालय तसेच राष्ट्रीय पंचायत राज मंत्रालय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ अधिकारी व पत्रकारांनी 13 जुन रोजी भेट दिली. यावेळी चांगले व आदर्श गांव यांची संकल्पना इतर गांवासमोर मांडण्यासाठी व गांवात आणखी काही विकास कसा करता येईल. यावर चर्चा झाली.

प्रसंगी पाटोदा गावाला भेट देणाऱ्या पथकाने गांवाची प्रत्यक्ष पाहणी करून राबविण्यात आलेल्या नवीन संकल्पना आत्मसात केल्या. तसेच पाटोदा गावाला एवढे पुरस्कार कशा पद्धतीने मिळाले, त्यासाठी कोणत्या अभियानात भाग घेतला व यासाठी काय काय अडचणी आल्या व त्यावर कशी मात केली. या विषयी चर्चा झाली. भारत सरकारने गाव विकासाच्या दृष्टीकोनातून कोणते पाउल उचलावे. हे या प्रसंगी समजून घेण्यात आले. त्यासाठी उपसंचालक अदिती अग्रवाल, हिंदुस्तान टाईमचे अभिषेक अंगद, इंडियन एक्सप्रेसचे हरी किशन शर्मा, मिलेनियमचे कुमारी सोनिका भाटीया, दैनिक जागरणचे जितेंद्र शर्मा, पीटीआयच्या अंजली ओझा, डीडीजी यशदाचे मल्लिनाथ कलशेट्टी, एसआरआरडीचे उपसंचालक शरदचंद्र माळी, सतीश वानखेडे, दैनिक सकाळचे संदीप लांडगे, एएनआयचे दिनेश दिवे, दिव्य मराठीचे गणेश गाडेकर, दूरदर्शनच्या शामा मिश्रा, कपिल म्हस्के, आकाशवाणीचे समरजीत ठाकूर आदींनी भेट दिली.
यावेळी छत्रपती संभाजीनगरचे उप मुख्य कार्यकारी ढोकणे, विस्तार अधिकारी कुंटे, सहायक गट विकास अधिकारी शिवाजी साळुंखे, विस्तार अधिकारी जायभाये, गवळी, सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामपंचायत अधिकारी एस टी उमप, माजी सरपंच भास्करराव पेरे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई पेरे, बेबीबाई पेरे, मीरा जाधव, मंदा खोकड, सुनिता पेरे, शामल थटवले, पुनम गाडेकर, छाया पवार, लक्ष्मण मातकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *