March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.1) – आदर्श पाटोदा गावात श्री शिरोमणी हनुमान मंदिराच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त विजयादशमी (दसरा)च्या शुभमुहूर्तावर ह.भ.प.किर्तनचंद्रिका सौ. रोहिणीताई परांजपे (पुणे ) यांच्या जाहिर किर्तनाचे आयोजन करण्यात आले.

उद्या गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत हनुमान मंदिर, आदर्श गाव पाटोदा येथे होणाऱ्या या किर्तनाला गायणाचार्य ह.भ.प. संगीत अलंकार प्रकाश महाराज कातकडे शेवगाव, ह. भ. प. संगीत अलंकार किशोर महाराज शेळके राहुरी, ह. भ. प. अनिल महाराज साबळे, मृदंगाचार्य ह.भ.प. मृदंग विशारद गिरजीनाथ महाराज जाधव सिद्धपुर हे साथसंगत करणार आहे. किर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाळूज परिसरातील सर्व भाविक भक्तांनी व हितचिंतकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन समस्त गावकरी मंडळी आदर्श गाव पाटोदा व गंगापूर (नेहरी) पाटोदावाडी यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *