
वाळूज महानगर, (ता.13) – चोरी केलेली बुलेट दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांवर पोलिसांनी झडप घालून जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या 4 लाख 16 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी करण्यात आल्या. ही कारवाई मंगळवारी (ता.12) रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी रांजणगाव शेणपुंजी येथे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास केली. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरी केलेली बुलेट दुचाकी विक्रीसाठी रांजणगाव (शेणपुंजी) येथे दोन चोरटे येत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलिसांनी रांजणगाव येथे मंगळवारी (ता.12) रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास सापळा रचला. मिळालेल्या माहितीतील वर्णनाच्या संशयीत आरोपी दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गाडीची कागदपत्रे विचारले. प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवतात आरोपी अमित अशोक नगरे व सागर कांतीलाल दळवे ,(वय 23) म्हाडा कॉलनी गंगापूर यांनी दुचाकी चोरीची कबुली देत, चोरी केलेल्या विविध कंपनीच्या अन्य सात दुचाकी काढून दिल्या. यात एक बुलेट, तीन पल्सर, दोन हिरो स्प्लेन्डर, दोन एच एफ डिलक्स. अशा विविध कंपनीच्या 8 दुचाकींचा समावेश आहे. 4 लाख 16 हजार रुपये किंमतीच्या या दुचाकी आरोपीतांच्या ताब्यात जप्त करण्यात आल्या.
अट्टल वाहन चोर –
यातील आरोपी अमित अशोक नगरे (वय 27) रा. खंडोबा मंदिराजवळ, नेवासा खुर्द, ता. नेवासा हा अट्टल वाहन चोर असून त्याच्या विरुध्द मुकुंदवाडी, नेवासा, सोनई अशा विविध पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे 11 गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिय, पोलीस उपआयुक्त शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोउपनि दिपक रोठे, पोना. धिरज काबलिये, पोअं. सुरेश भिसे, अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, हनुमान ठोके, नितिन इनामे, सुरेश कचे, बाळासाहेब देवबोने, विठ्ठल शिंगाडे, राजाभाऊ कोल्हे, यांनी केली.
