वाळूजमहानगर, (ता.26) :- तू माझी नाही तर, कुणाचीही होऊ देणार नाही. व आज मी मरेल व तुलाही मारील. असे म्हणत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वडगाव (कोल्हाटी) येथे गुरुवारी (ता.24) रोजी रात्री 9 वाजता घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अल्पवयीन 17 वर्षीय मुलीच्या परिचयाचा शिवा साळुंखे रा. गट नंबर 7 वडगाव (को.) येथील मुलगा पिडीत मुलीच्या घराजवळ येऊन माझ्यासोबत रिलेशन मध्ये ये. असे म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला नकार देताच त्याने मुलीचा हात पकडून वाईट उद्देशाने जवळ ओढून, तू माझी नाही तर कुणाची नाही. असे म्हणत वाईट कृत्य केले. मुलीने आरडाओरड केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी (ता.25) रोजी सकाळी 8 वाजता बजाजनगरमध्ये मुलीच्या पाठीमागे येऊन मी मरेल आणि तुलाही मारेल. अशी धमकी देत निघून गेला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे हे करीत आहे.
