
वाळूजमहानगर, (ता.27) – एन्ड्युरन्स ग्रुपचा कामगार कंपनीकडे पहील्या शिप्टला येत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतमधील मेटलमॅन आटो तसेच वर्षा फोर्जिंग प्लाॅट नंबर बी -12 येथे आल्यावर शुक्रवारी (ता.27) रोजी सकाळी 6:30 ते 7:00 च्या दरम्यान झाला.

वाळुज औद्योगिक परिसरातील एन्ड्युरन्स ग्रुप कंपनीचा कामगार दत्तात्रय छगन भागवत वय 42 रा. बकवालनगर हा घरातून कंपनीत पहील्या शिप्टला स्वतःच्या दुचाकी (एम एच 20 एफजे -0322) वरून जात होता. त्याच वेळी भरधाव आलेल्या आज्ञात वाहनाने धडक दिल्याने दत्तात्रय छगन भागवत हा गंभीर जखमी झाला. या आपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तर दुचाकीचेही नुकसान झाले आहे. त्यांना ताबडतोब ईतर कंपनीतील ड्यूटीवर जाणारे कामगार आदींनी प्राथमिक उपचारासाठी तिरूपती हाॅस्पीटल येथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असल्याने आधिक उपचारासाठी सिग्मा हाॅस्पीटल येथे दाखल केले आहे.
