वाळूजमहानगर, ता.8 – मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पत्रकार दिन सोमवारी (ता.6) जानेवारी रोजी वाळूज येथे साजरा करण्यात आला.
यावेळी वाळूज ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष हुरखान पठाण यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. माजी सरपंच तथा चेअरमन सर्जेराव भोंड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार बबन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी वाळूज ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्जेराव भोंड यांनीही मनोगत व्यक्त करून पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे पाटील, सोसायटीचे माजी सचिव तथा माजी ग्रामपंचायत सदस्य शरदचंद्र अभंग, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदू सोनवणे, सचिन लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारत गायकवाड नानासाहेब जंजाळे, दत्तात्रय वाघ, मनोज जोशी, दीपक जोशी, पांडुरंग गायकवाड, नाना अल्हाट, अशोक श्रीखंडे, रामराव भराड, विठ्ठल म्हस्के पाटील, इफत इनामदार, केशव पवार, सुनिल मुळे, शिवाजी तांबे, संकेत निकम यांची उपस्थीती होती.