वाळूजमहानगर, (ता.17) – बजाजनगर येथील 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनानिमित्त
भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील, 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भीमराव वाकचौरे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विजय राऊत, प्राचार्य डॉ.राहुल हजारे, उपप्राचार्य संजय सांभाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात चित्रकार यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे, राजू बावस्कर, प्रा.सरीता उंबरकर, प्रा दीपक अंकलखोपे, प्रा पुनमचंद रेशवाल, प्रा त्रिशला काळे, सेजल सीरसाट, गणेश पाध्ये, रितेश मनगटे,
वैष्णवी जंजाळ, शुभांगी जाधव, सीमा जाधव, मयुरी अकोदे, चंचल पवार, ओम मालवणकर, समीर शहा, साक्षी जडे, साक्षी कटारे या महिला, मुली, मुले, पुरुष चित्रकारांनी आकर्षक रंगसंगती करून अगदी हुबेहूब चित्रे काढून प्रदर्शनात मांडले. या चित्राची निहाळणी करून उपस्थित मान्यवरांनी चित्रकाराचे कौतुक केले.