March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – आईच्या कुशीत झोपलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून नेत असताना चिमुकली रडल्याच्या आवाजाने आईला जाग आल्याने अपहरण कर्त्याचा चिमुकलीच्या अपहरणाचा डाव फसला. ही घटना वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे 3 जुन रोजी घडली.

वडगाव कोल्हाटी येथील फुलेनगर मध्ये राहणाऱ्या राणी राजू उबाळे या उकाड्याच्या वातावरणामुळे दोन वर्षीय चिमुकलीला आपल्या कुशीत घेऊन 2 जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारासघराबाहेरील ओट्यावर झोपल्या होत्या. दरम्यान आरोपी भरत राजू गडवे यानी चिमुकलीचे अपहरण करून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चिमुकली रडल्याने आईला जाग आल्याने राणी उबाळे यांनी आरडाओरड केली. या वेळी शेजारील नागरिक मदतीला धावून आल्याने अपहरणकर्त्या आरोपीने चिमुकलीला फेकून देऊन पळ काढला. शनिवारी (ता.3) रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन वर्षे चिमुकलीच्या हनुवटीला दुखापत झाली. याप्रकरणी राणी उबाळे यांचे फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात भरत गडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *