वाळुज महानगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियान तालुकाभर सुरू असून आंबेलोहळ येथे शनिवारी (ता.15) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 80 नवीन सदस्यांची नावे नोंदणी करण्यात आले.
देशाचे नेते शरदचंद्र पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे आमदार सतिश चव्हाण (भाऊ), माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, गंगापूर तालुका अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली अंबेलोहळ सर्कल मध्ये गावनिहाय सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता.15) ऑक्टोंबर रोजी अंबेलोहळ येथे सदस्य नोंदणी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी क्रियाशील सदस्य 80 नोंदणी झाली. हे अभियान राबविताना अंबेलोहळचे माजी उपसरपंच कल्याण बाबु प्रधान, ग्रामपंचायत सदस्य वसीम कुरैशी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर उगले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शेख युनुस महेमुद, राऊफ कुरैशी, एकनाथ देसाई, सलमान खान, अरूण चोरमारे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.