
वाळुज महानगर, (ता.12) – एका 28 वर्षीय तरुणाला अज्ञात आरोपींनी काहीतरी कारणावरून बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना वाळुज परिसरातील आंबेलोहळ येते शनिवारी 12 जून रोजी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे मयत तरुण हा अर्ध नग्न अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहळ येथील अर्जुन रतन प्रधान वय 28 या तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह शनिवारी 12 जून रोजी सकाळी आढळून आला.
एकलहेरा रस्त्याच्या कडेला हा मृतदेह पडलेला होता. त्याला कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला असण्याची शक्यता आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे
