
वाळूजमहानगर (ता.16) – “हमारी मांगे पुरी करो” असा नारा देत पोलिसांवर चालून आलेल्या संतप्त जमावावर सशस्त्र पोलिसांनी हॅन्ड ग्रॅनेट, अश्रधूराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगण्यासाठी पाण्याचा मारा तसेच लाठी चार्ज केला. गुरुवारी (ता.16) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकारादरम्यान सर्वत्र थरार उडाला. मात्र नंतर कळले की, हे पोलिसांचे मॉकड्रिल होते. 
आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव, अंदोलन तसेच इतर सामाजिक व राजकिय कार्यक्रमांच्या काळात तेढ निर्माण होवून तणावपुर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, गुन्हेगारांवर वचक राहावा, तसेच पोलीस हे नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे सरंक्षणासाठी सजग व तयार आहे. याकरीता दंगा काबु योजना सराव (मॉक ड्रिल) करण्यास पोलीस आयुक्त यांचे आदेश असल्याने गुरुवारी (ता.16) रोजी 3 ते 5 वाजेच्या सुमारास वाळुज एमआयडीसी पोलीस पोलीस ठाण्याच्या वतीने दंगा काबू योजना सराव घेण्यात आला.
या दंगा काबू योजना सरावासाठी पोलीस आयुक्तालय पोलीस कंट्रोल रुम येथील आर सी पी, क्यू आर टी पथक, पोलीस मुख्यालयातील राखील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस प्रशिक्षण देणारे शिक्षक तसेच वाळुज एमआयडीसी पोलीस खाण्याचे अधिकारी व अंमलदार, वज्र, वरूण वाहने, पाण्याचे टँक्टर, अंम्बूलन्स, अग्नीशमन दलाचे अधिकारी अंमलदार, यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता. या दंगा काबू योजना सरावामध्ये बेकायदेशीर जमावावर वज्र वाहनातून पाण्याचा फवारा मारणे, गँसगणव्दारे आश्रूधुर नळकांडया फोडणे, हँन्ड ग्रेनाईट जमावावर फेकणे, गैरकायद्याच्या जमावातील जमाव भडकवणाऱ्या, लोकांना ताब्यात घेणे.अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
हा दंगा काबू सराव पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, अपर्णा गिते, शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांचे आदेश व सुचना प्रमाणे वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोनि.गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोउपनि. राहूल निर्वळ, संदिप शिंदे, शिवाजी घोरपडे, दिपक रोठे, प्रविण पाथरकर आदींनी सहभाग नोंदवला.
