
वाळूजमहानगर, (ता.29) – वाळूज परिसरात रविवारी (ता.28) रात्री 12.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलीसांनी पकडलेला संशयित तरुण रेकार्डवरील गुन्हेगार निघाला. त्याच्याविरुध्द लुटमारीसह विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी ते रविवारी रोजी रात्रीच्या सुमारास वाळूज परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान सिडको वाळूजमहानगरातील एका दुकानाजवळ गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक इसम अंधारात लपून बसलेला रविवारी (ता.28) रात्री 12.30 वाजेच्या सुमारास दिसला. या संशियत इसमास पोलीस पथकाने पाठलाग करुन पकडले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव आशिष रमेश गवई (22), रा. काचीपुरा, तीसगाव असल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, पोकॉ. हनुमान ठोके, गणेश सागरे, नितीन इनामे, रविंद्र गायकवाड आदींनी केली.
आरोपी निघाला रेकार्डवरील गुन्हेगार –
आरोपी आशिष गवई यास ताब्यात घेऊन पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने 27 डिसेंबरला रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ए.एस.क्लब चौफुलीवर बसमध्ये उतरुन घराकडे फोनवर बोलत जाणा-या श्रीयश बालाप्रसाद सोनी (24) यांचा 40 हजार रुपये किमंतीचा महागडा मोबाईल हिस्कावल्याची कबुली दिली. त्याच्या विरुध्द दुचाकी चोरी, लुटमार करणे, मारहाण करणे आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असून तो रेकार्डवरील गुन्हेगार आहे.
