February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.25)- विनापरवाना व बेकायदेशीर रित्या वाळूचा उपसा करून ती वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर वाळुज एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून 5 हजार रुपये किमतीच्या 1 ब्रास वाळूसह 7 लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता.24) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जयमल्हार चौक, सिडको वाळुज महानगर-1 येथे करण्यात आली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी आर्यन विलास दाभाडे याने त्याच्या ताब्यातील 407 टेम्पो (एम एच 01, एल -2355) यात अंदाजे 1 ब्रास वाळु अवैध व बेकायदेशीरपणे कोठुन तरी उपसा करुन चोरटी वाहतुक करत असताना रविवारी (ता.24) रोजी दुपारी 1.20 वाजेच्या सुमारास जयमल्हार चौक, सिडको वाळुज महानगर-1, येथे मिळुन आला. या टेम्पोतील 5 हजार रुपये किमतीच्या वाळूसह 7 लाख रुपये किमतीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सुरजकुमार जिवन अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आर्यन विलास दाभाडे (वय 19) रा. तिसगाव, ता.जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 379, गौण खनिज अधिनियम कलम 21 (1), 48 (7), 48(8) भादंवि. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *