March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.9) – गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध गुटख्यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण जवळ जवळ 80 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. वाळूज पोलिसांनी केलेली ही कारवाई नायगाव बकवालनगर येथे शुक्रवारी (ता. 8) रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रिमीयन राजनिवास सुगन्धित पान मसाला, प्रिमीयम झेड एल-01 जाफरानी जर्दा, रॉयल 727 नावाची सुगंधीत तंबाखु, हिरा पान मसाला, गोवा-1000 सुगंधीत तबांखु अशा गुटख्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. हे पदार्थ मानवी शरीरास घातक असल्याची माहिती असूनसुद्धा आरोपी निशाद अमीन शेख वय 23 वर्ष, रा. नारायणपूर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सापळा रचून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारच्या गुटख्यासह शाईन होन्डा दुचाकी (एम एच 20, डीएन -9565), मोबाईल. असा एकूण 79 हजार 742 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हनुमंत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निशाद अमीन शेख रा.नारायणपूर याच्या विरुध्द वाळुज पोलीस ठाण्यात कलम 188, 272, 328 भा.दं.वि. सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक भगवान मुजगुले, त्रिभुवन यांनी शुक्रवारी (ता. 8) रोजी 10.30 वाजेच्या सुमारास केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढोले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *