वाळूजमहानगर, ता.26 – लासुर स्टेशन येथील अविष्कार इंग्लिश स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मशाल प्रज्वलित करून गुरुवारी (ता.23) जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात करण्यात झाले.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ.भरतसिंग सलामपुरे, संदीप आढाव, पूजा दाभाडे आणि मोनिका कोचर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक तथा मुख्याध्यापक रवी दाभाडे होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणे केली. या क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांनी बलून ड्रिल, रिबन ड्रिल, डंबेल ड्रिल, रिंग ड्रिल, आणि पॉम-पॉम ड्रिल सादर केली. पालकांसाठी खेळ आणि विद्यार्थ्यांसाठी मजेदार शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या.