April 8, 2026


वाळुजमहानगर, (ता.8) – माझ्या विरुद्ध तक्रार देता का. आता तुम्हाला दाखवतो. अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीस लाकडी दांड्याने मारुनं जखमी केले. ही घटना पंढरपूर येथील गिरीराज हाऊसिंग सोसायटीत सोमवारी 6 एप्रिल रोजी सकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल गणपत गिरी रा. जवखेडा ता. जाफराबाद जि. जालना याने तुम्ही माझ्या विरुद्ध तक्रार देता का. आता तुम्हाला दाखवतो. अशी धमकी देऊन त्याच्या हातातील लाकडी दांड्याने मयुरी अशोक गिरी या मुलीस पाठीवर मारुनं जखमी केले. पंढरपूर येथील गिरीराज हाऊसिंग सोसायटीत सोमवारी 6 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी राधा अशोक गिरी (वय 38 वर्ष) रा. गिरीराज हाऊसिंग सोसायटी, कामगार चौक पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अमोल गणपत गिरी रा. जवखेडा ता. जाफराबाद जि. जालना त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *