वाळुज महानगर, (ता.23)- अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मुर्तिप्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त बजाजनगर येथील अयोध्यानगर राममंदीर येथे सकाळी अभिषेक तसेच दुपारी 12 वाजेपासुन अयोध्या येथील लाइव्ह प्रक्षेपण स्र्किवर दाखविण्यात आले.
यावेळी मंदिर परिसरात सडा रांगोळी व फुलांची आरास करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. सर्वत्र भक्ती मय वातावरण निर्माण झाले होते. या भक्ती माय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जय जय कार करत परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.
सायंकाळी दिपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री 8 वाजता महाआरती व त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिरात दर्शन आणि प्रसादा मराठी मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम सेवाभावी संस्था तसेच श्रीराम मित्रमंडळ अयोध्यानगर बजाजनगर छत्रपती संभाजीनगर यांनी परिश्रम घेतले. 
