वाळूजमहानगर (ता.14) : – अभ्यासातच विद्यार्थ्यांचे भवितव्य आहे, त्यामुळे जितका अभ्यास कराल, तितका फायद्याचा असतो. अभ्यासात कुचराई केल्यास मेहनतच करावी लागेल आणि चांगला अभ्यास केल्यास राजासारखे जीवन जगता येईल. गरजू विद्यार्थ्यांना बारावीनंतर कुठलीही मदतीची गरज असल्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन इप्का कंपनीचे मानव संसाधन प्रमुख व्यंकट मैलापुरे यांनी लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळ येथे करिअर मार्गदर्शन शिबिरात शनिवारी (ता.12) रोजी दिले.
वाळूज येथील इप्का लेबोरेटरीज कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षिय भाषणात व्यंकट मैलापुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच बारावीनंतर विविध क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी करावे लागणारे परिश्रम या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उर्मी संस्थेचे संचालक जय उपासे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी बोडखे, के पी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना प्रेरणादायी वक्ते जय उपासे यांनी विविध थोर व्यक्तींचे उदाहरणे देऊन करिअर घडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच गरिबीला शाप न मानता कठोर परिश्रम करून जीवनात यशस्वी व्हा. असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी, सूत्रसंचालन के.बी.मोरे तर प्रतिभा नितनवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक विलास जाधव, शिवाजी महाजन, अनिल कुमावत, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, ए.एन.शेख, सी.एच.गायकवाड, आर. एच. शिरसाट, तुकाराम शेलार, आर. बी.सांगळे, आनंद बोडखे यांच्यासह कर्मचारी एस.बी.बनकर, बी.जे.पांडव, ए.एस.बिरुटे आदींनी परिश्रम घेतले.