March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.3) – जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर अमाणूषपणे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.4) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान अफवावर विश्वास न ठेवता बंद शांततेत पाळण्याचे आवाहन वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे.

या बंद दरम्यान एम आय डी सी वाळूज परिसरातील अस्थापणा आणि अत्यावशक सेवा सुरु राहणार आहे.

सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता.4) छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने एमआयडीसी वाळूज परिसरात कोणत्याही अनुचित घटना घडू नये म्हणून परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा तसेच वाळुज औद्योगिक परिसरातील कारखाने सुरू राहणार आहेत.

वाळुज एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 15 अधिकारी, एस आर पी एफ जवानांची टीम, 150 पोलीस कर्मचारी बंद दरम्यान तैनात राहणार आहेत. या बंद दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *