
वाळूजमहानगर, (ता.30) – मातोश्रीनगर, कमळापुर येथून 27 ऑक्टोबर रोजी अपहरण झालेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अद्यापही थांगपत्ता लागला नसल्याने कुटूंबिय व पोलीस हवलदिल झाले. दरम्यान, या मुली विषयी काही माहिती असल्यास पोलीसांशी संपर्क साधवा असे अवाहन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज यांनी केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समृध्दी गोतम सातपुते वय 14 वर्ष ही आई, वडील व लहान भावासोबत मातोश्रीनगर कमळापुर राहत होती. राहत्या घरासमोरून तिचे 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तिचे अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. तीचा आजुबाजूला, नोतवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती अद्यापही मिळून आली नाही. वर्ण सावाळा, उंची 4 फुट, चेहरा उभा, केस काळे व लांब, भाषा मराठी बोलते. असे तिचे वर्णन आहे. ती कोणाला कुठे आढळ्यास किंवा तिच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. असे अवाहन पोउपनि विनोद अबुज यांनी केले आहे.
