
बजाजनगर, (ता.21) – वाळुज महानगराचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात अपरा एकादशी निमित्त शुक्रवारी (ता.23) रोजी सकाळी 11 वाजता भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित संत चरित्रकार ह.भ. प. सागर महाराज काचोळे, जवखेडा ता. कन्नड यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले असून पहाटे महाभिषेक, संतपूजन व अन्नदान सतीश विखे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या एकादशी सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.
