वाळूज महानगर – अंदाजे 35 वर्षीय एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाळुज परिसरातील लिंबे जळगाव टोलनाक्याजवळील लवकी नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (ता.23) सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास आढळून आला. मात्र हा खून आहे की आत्महत्या या संभ्रमात पोलीस सापडले आहे.
या विषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लिंबे जळगाव येथील शिवराई टोल नाक्याजवळून लवकी नदी वाहते. या नदीवरील औरंगाबाद पुणे महामार्गाच्या पुलाजवळील पाण्यात एक मृतदेह पडलेला असल्याची माहीती शुक्रवारी (ता.23) सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास मिळाली. त्यामुळे वाळूज पोलिस ठाण्याचे अंमलदार जी बी.जोनवाल यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी घाटीत दाखल केला असता डॉक्टरांनी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तपासुन मयत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस संभ्रमात –
वाळूज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आढळून आलेल्या या मृताची ओळख पटली नाही. शिवाय त्याचा खून करण्यात आला की त्याने आत्महत्या केली. याबाबत शंका व्यक्त करण्यात येत असून हा खून आहे की आत्महत्या या संभ्रमात वाळूज पोलीस सापडले आहेत.