February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता 18) – पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या वादानंतर घरात घुसून एका 30 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर बळजबरीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने कार बंद पडल्याने तो त्याच्या तावडीतून सुटून पोलीस ठाणे गाठल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान तो गंभीर जखमी असल्याने आयसीयू मध्ये उपचार घेत आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जाम, ता. जि. बुलढाणा येथील उमेश बाबुराव बुझाडे (हल्ली मु. गट नंबर 6, स्वस्तिक सिटी वडगाव कोल्हाटी) हा आरती ट्रान्सपोर्ट येथे अकाउंटंट म्हणून काम करतो. त्याच्या शेजारी भाड्याने राहणाऱ्या राहणाऱ्या योगेश जाधव याच्या सोबत बुझाडे याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बुझाडे व जाधव या दोघांमध्ये सहा महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उमेश बुझाडे व त्याचा मित्र धनंजय गिते हे दोघे दुचाकीवरून घराकडे जात असताना एएस क्लब चौकात योगेश जाधव हा कारसह तेथे उभा होता. तो पाठलाग करत असल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास उमेश घरी असताना योगेश जाधव हा एका मित्रासह उमेश बुझाडेच्या घरी आला. व शिवीगाळ करत असताना उमेश याच्या पत्नीने जाधव याला तेथून हकलुन दिले. मात्र त्यानंतर योगेश जाधव हा चार मित्रांना घेवून पुन्हा आला आणि दरवाजा तोडून उमेश यास शिवीगाळ करीत घराबाहेर ओढून लाथबुक्याने व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यानंतर उमेश याचे जखमी अवस्थेत कारमधून अपहरण केले. परंतु कार मध्येच बंद पडल्याने सगळे जण खाली उतरले. यावेळी संधी साधून उमेश त्यांच्या तावडीतून सुटला. व पोलीस ठाणे गाठले. हा प्रकार समजल्यानंतर उमेश याचा भाऊ गणेश बुझाडे याने त्याला बजाजनगरातील एक खाजगी रूग्णालयात दाखल केले. उमेश यांच्या डोक्यात गंभीर दुखापात झाले असुन 30 ते 35 टाक्के पडल्याने त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या प्रकरणी उमेश बुझाडेच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश जाधवसह 6 अनोळखी विरूध्द वाळूज एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी सायकांळी 7:30 वाजेच्या सुमारास उमेश दुचाकीवरून घरी जात असतांना त्याच्या दुचाकीला चोरडीया फार्महॉऊसजवळ पाठीमागून आलेल्या एका कारने जोराची धडक दिली. त्यात तो थोडक्यात बचावला. मात्र त्यानंतर पुन्हापुन्हा दुचाकीला कारने धडक दिल्याने उमेश खाली पडल्याने लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न करत असताना उमेश दुचाकी सोडून पळून पोलीसांना 112 वरून फोन केला. त्यामुळे कारचालक तेथून फरार झाला.

               दरम्यान सहा जणापैकी दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने योगेश जाधव रा.म्हारोळा ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर व दिनेश सोबकचंद मेहर (रा. पेंडापूर ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांना स्विफ्ट कारसह ताब्यता घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *