
वाळूजमहानगर, (ता.4) – बाहेरच्या महिलेचा नाद सोडून देण्यास सांगीतल्याचा राग मनात धरून 30 वर्षीय पतीने स्टिलच्या झाऱ्याने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय पत्नीचा रविवारी (ता.3) रोजी तिचा मृत्यू झाला. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शुक्रवारी (ता.1) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही मारहाण झाली होती. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रियंका संदिप राऊत (28) रा. जयभिमनगर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर हिचा विवाह 2019 मध्ये संदिप रामदास राऊत (30) रा. इरला, पो. चांडोळ, ता. जि. बुलढाणा, याच्यासोबत झाला होता. त्यानंतर संदीप राऊत व प्रियंका हे 2021 पासुन सवता माळी मंदीराच्या पाठीमागे गजानन ढेरे यांच्या घरी रांजणगांव (शे.पु.) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे किरायाणे राहत होते. संदिप राऊत याचे रांजणगांव (शे.पु.) परीसरात अज्ञात बाईसोबत प्रेमसंबंध चालू असल्याचे प्रियंका हीस तिचा नवरा संदिप राऊत याने सांगीतले होते. व संदीप राऊत हा ” मी त्याबाई सोबतच राहणार व तुला सोडून देणार’ म्हणून गेल्या काही दिवसापासून वाद घालून नेहमी मारहाण करत होता. व तिला जीवे मारण्याची धमक्या देत, “मी एकदा तुला सोडल पण त्याबाईला सोडणार नाही” असे म्हणून रोज शिवीगाळ करून मारहाण करत होता. ही बाब प्रियंकाने भाऊ आनंद व आई विमलबाई डेरे, वडील गणेश डेरे यांना दिवाळीत घरी आली तेव्हा सांगीतली. त्यावर प्रियांकाला मारहाण करु नको, तुझे बाहेरख्यालीचे धंदे बंद कर, बाहेरच्या बाईचा नाद सोडून दे. असे स्पष्ट सांगीतले होते. शुक्रवारी (ता.1) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास संदिप राऊत याने विमलबाई डेरे हिस फोन करुन सांगितले की, “माझे व प्रियंका हिचे भांडण झाले असुन प्रियंकाला तुमच्या घरी घेवुन जा, मला तिच्या सोबत राहायचे नाही.”
त्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रियंकाचा फोन आला तेव्हा ती मध्यवर्ती बसस्थानकावर होती. तिचा भाऊ तिला घेण्यासाठी गेला असता तिने सांगितले की, 
मला नवऱ्याने लाथा भुक्क्याने व स्टीलच्या झाल्याने खूप मारले. तिला त्रास होत असल्याने उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून रविवारी (ता.3) रोजी मयत घोषीत केले. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ आनंद गणेश डेरे, (21) रा. टाऊनहॉल जयभिमनगर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी संदिप रामदास राऊत कलम 302, 504, 506 भादंवि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
