वाळूज महानगर (ता.19) :- सरकारी गायरान जमीनीवरील अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार काढण्यात येणार आहे. परिणामी अनेक अतिक्रमण धारक बेघर होणार आहे. त्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल करुन अतिक्रमणे काढण्याचा निर्णय स्थगित करावा. व सर्वसामान्य नागरिकांना अभय द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाळुज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गट 14 मध्ये 105 एकर गायरान जमिनीवरील 1995 पूर्वीचे निवासी अतिक्रमण झालेले आहे. या गायरान जमिनीवर घरे बांधून हजारो कुटुंब राहत आहे. परंतु शासनाने 31 डिसेंबर पर्यंत अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले असल्याने जोगेश्वरी येथील हजारो कुटुंब हे रस्त्यावर येऊ शकतात.
राज्यातील अतिक्रमण नियमानकुल करण्याबाबतचा मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ पीआयएल 39/2014 दिनांक 23 जून 2017 हा आदेश मा सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन सुमुटी पीआय एल /2/2022 या जनहित याचिकेतील अतिक्रमण आदेशवर स्थगिती घ्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर नीळ, कल्याण साबळे, कलीम शहा, राजेंद्र निंबाळकर यांनी मुंबई येथे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची भेट घेऊन केली आहे.