वाळूजमहानगर – ज्याप्रमाणे परिस स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले, त्याचप्रमाणे समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट झाल्याने संभाजीनगर, वाळूज येथील माझ्या समाजकार्यासाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली, स्फूर्ती वाढली. कार्य करण्याचे बळ आले. त्यांचा आदर्श घेऊन समाज, संस्था आणि देश कार्यात यापुढेही मी अधिक जोमाने काम करणार असल्याचे व्यंकट मैलापुरे यांनी सांगीतले.
वाळूज परिसरात व संभाजीनगर जिल्ह्यात समाज सेवेत कार्यशील व आग्रेसर व्यक्तिमत्त्व अशी ओळख व्यंकट मैलापूरे यांची आहे. ते वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका औषध निर्माण कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत असुन गेल्या 25 वर्षापासून त्यांनी स्वतःला समज कार्यात एवढे झोकून दिले आहे की, त्यांच्या सेवेची प्रत म्हणून नुकतेच मानसी सेवा भावी या संस्थेने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. मैलापूरे हे एका शेतकरी कुटंबातील असुन त्यांना प्रत्येक गोष्टीची बारकाईने जाणीव आहे, स्वतः सातत्याने धडपड करून समाज उपयोगी उपक्रम, कार्य ते नेहमी राबवत असतात. वाळुज परिसरात त्यांचे वृक्ष संवर्धनाचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. याच वृक्ष संवर्धन अंतर्गत वृक्ष प्रेमींची सहल म्हणून ते समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावी गेले होते. तेथे त्यांची अण्णांशी भेट झाली. या भेटीनंतर ते म्हणतात की, ज्याप्रमाणे लोखंडाला सोने करण्यासाठी परिस स्पर्शाची गरज असते, याचप्रमाणे अण्णांच्या भेटीमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले आणि माझ्या चालू असलेल्या कार्यात आणखी कार्य करण्याचे बळ मिळाले. त्यांचा आदर्श घेऊन समाज, संस्था आणि देश कार्यात मी यापुढेही यापेक्षा अधिक जोमाने काम करील. जसा मैलापुरे यांनी समाजसेवक अण्णांचा आदर्श घेतला. तसाच आदर्श घेऊन आपणही यापुढे समाजकार्यात सहभाग घ्यावा.