February 23, 2025

 

             वाळूजमहानगर – घरी कोणीही नसताना
12 शिकणाऱ्या वीत एका अठरा वर्षीय तरूणीने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बजाजनगर येथे घडलेली ही घटना गुरूवारी (ता.6) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.


बजाजनगर येथील जय भवानी चौकाजवळील आर एम 249 मधील फोरबस हौसिंग सोसायटीत संजय रणनवरे हे कुटुंबासह नरेंद्र खरात यांच्या घरात किरायणे राहातात. रणनवरे हे येथील एका खाजगी कंपनीत कामगार असून त्यांची पत्नीही एका कंपनीत कामाला जाते. नेहमीप्रमाणे पतीपत्नी गुरूवारी (ता.6) रोजी कामावर गेलेले असतांना त्यांची अठरा वर्षीय मुलगी निकीता हिने स्वयंपाक घरातील छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 12 वीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास निकीताचे आईवडील कंपनीतून घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मदनसिंग घुणावत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत निकीताला फासावरून खाली उतरवत रुग्णवाहिकेतून घाटीत रवाना केले. मात्र तेथील डाॅक्टरांनी निकीताला तपासून मृत घोषित केले. दरम्यान निकीताने आत्महत्या का केली यांचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मदनसिंग गुनावत करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *