वाळुज महानगर, (ता.18) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अंदाजे 45 ते 50 वर्षीय अनोळखी पादचारी इसमाला जोराची धडक दिली. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील रहिमपूर फाट्यावर रविवारी 13 जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात त्या अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान सोमवारी 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, अनोळखी ईसम वय अंदाजे 45 ते 50 वर्षे यांना रविवारी 13 जुलै रोजी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास रहीमपुर फाटा अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात अनोळखी इसम हा गंभीर जखमी झाला. त्याला घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे मेडीसिन वार्डात औषधोपचार कामी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान सोमवारी 14 जुलै रोजी सायंकाळी 5:35 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु कलम 194 बी एन एस एस प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस ए दिलवाले व पोलीस कॉन्स्टेबल गणेश लक्कस करीत आहे.
अनोळखी असल्याने मृतदेह घाटी शीतग्रहात-
त्याच्या प्रेतावर मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले असुन सदर अनोळखी मयताची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्या अनोळखी मयत इसमाची ओळख पटण्याच्या दृष्टीने त्याचा मृतदेह घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे शीतगृहात तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आला आहे.

त्याचे वर्णन असे –
नाव- अनोळखी, वय अंदाजे 45 ते 50 वर्षे, रंग-काळा सावळा, उंची अंदाजे 5 फुट 3 इंच, शरीरावर अपघातात गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्याच्या ओळखी बाबत काही माहीती मिळुन आल्यास 9518583645 या मोबाईल नंबरवर फोन करुन माहीती द्यावी. असे आवाहन वाळूज पोलिसांनी केले आहे.
