February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.26) -भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमीस श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेने उपचारार्थ घाटीत दाखल केले. हा अपघात शुक्रवारी (ता. 23) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव जवळ झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंदाजे 45 वर्षे इसम रस्त्याने पायी जात असताना त्यास भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने चोराची धडक दिली.
औरंगाबाद नगर हायवेवरील लिंबेजळगाव फाट्यावर मराठा हॉटेल समोर झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला.
शुक्रवारी (ता.23) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाता प्रकरणी हजारे ताई यांनी नाणीजधामच्या रुग्णवाहिकेला कॉल केला. ही माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या नानिजधाम रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमी संजय मुक्तियार सिंग राजपूत वय 45 यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले. या अपघाताची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *