March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.14)- कंपनीत जाणाऱ्या एका कामगाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात बुधवारी (ता. 14) रोजी सकाळी झाला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदकीशोर भगवान सोळंकी ( वय 30) रा.इंद्रप्रस्थ कौलनी, बजाजनगर. हा कामगार बुधवारी (ता.14) रोजी सकाळी वाळुज औद्योगिक वसाहत कंपनीमध्ये कामासाठी जात होता. त्याला अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात झालेल्या या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच इसारवाडी फाटा येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमी नंदकिशोर सोळंकी यांना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *