March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.11)- भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 60 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील रहिमपूर फाटा येथे बुधवारी (ता.10) दुपारी 1 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील बाबासाहेब सजनराव पारदे (वय 60 वर्षे) हे बुधवारी (ता.10) दुपारी 1 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20, डी आर -2975) वरून दहेगाव (बंगला) कडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वाळूजकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने रहीमपूर फाटा येथे जोराची धडक दिली. या अपघातात बाबासाहेब पारदे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच त्यांना किरण बाबासाहेब पारदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान पारदे यांचा सायंकाळी 7.35 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *