March 22, 2026


वाळुज महानगर, (ता.23) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी 22 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर ढोरेगाव फाट्यावर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश रघुनाथ शिंदे (वय 32) रा. पिंपळवाडी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा ढोरेगाव फाट्यावर रोडच्या कडेने पायी चालत असताना त्याला भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक देऊन गंभीर जखमीं केले. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधाम यांच्या 24 तास सेवेत असणाऱ्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमी गणेश शिंदे याला जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले. तो गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *