February 5, 2026

वाळूजमहानगर ता.26 (बातमीदार) – भरधाव जाणारी दुचाकी व अज्ञात वाहन यांच्यात धडक होऊन दुचाकी वरील 65 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असलेल्या एका महिलेसह एक पुरुष असे दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.26) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ईसारवाडी फाट्याजवळील शेंदूरवादा रोडवर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तामुसवाडी ता. नेवासा जि. नगर येथील भीमाबाई खोपडे, शोभा खोपडे व
अमोल खोपडे असे तिघे जण शनिवारी (ता.26) दुचाकी (एम एच 17,बी डब्ल्यु – 5292) वरून बिडकीन येथे लग्नासाठी जात होते. त्यांची दुचाकी शेंदुवादा ते इसारवाडी फाटा रोडवरील मुरमी पुलावर येताच भरधाव आलेले अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात जोरात धडक झाली. सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात दुचाकी वरील भीमाबाई हिरामण खोपडे (वय 65) रा. तामुसवाडी ही वयस्क महिला जागीच ठार झाली. तर अमोल राजेंद्र खोपडे वय अंदाजे 35 व शोभा खोपडे वय अंदाजे 30 रा. तामुसवाडी ता.नेवासा हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत या अपघातातील अज्ञात वाहन फरार झाले होते. तर जखमी रुग्णालयात गेले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *