वाळुज महानगर, (ता.3) – वाळूज येथील अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटी येथे मकर संक्रांती निमित्त आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम 2 फेब्रुवारी 2025 रोजी मोठया उत्साहात झाला.
या कार्यकमामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग घेतला. यावेळी मनोरंजनात्मक खेळ घेऊन कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटीच्या संचालक सविता सूर्यवंशी, उषा मंदीलकर, लता हाडोळे, उषा धुळगुंडे, जयश्री तोगे, आशा म्हस्के, शितल धांडे, सुलभा देशमुखे आदींनी परिश्रम घेतले.