March 23, 2026

वाळुजमहानगर, (ता. 23) – अंबेलोहळ येथील सावता मंगल कार्यालयात 17 मे पासून आयोजित करण्यात आलेल्या संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ ‌‌सोहळ्याची सांगता शनिवारी (ता.24) रोजी करण्यात येणार आहे.

या सप्ताहात हभप आचार्य स्वामी शतानंद महाराज (श्री सिद्ध गणेश मंदिर शिवराई) यांच्या अमृतमय वाणीतुन भागवत कथा भाविकांनी श्रवण केली. त्यांना संगीत गायन साथसंगत नंदकुमार शिहारे, नारायण जाधव, संभाजी डुकरे, विनायक जाधव यांनी केली. दरम्यान शनिवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत आचार्य 108 स्वामी शतानंद महाराज यांच्या काल्याचे हरीकीर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. परीसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह समितीसह‌ ग्रामस्थांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *