
वाळूज महानगर, (ता.29) – मातृवंदना, लाडकी बहीण, एफ.आर.एस., आणि बी.एल.ओ. आदी कामाच्या सक्तीच्या निषेधार्थ शूक्रवारी 29 ऑगस्ट रोजी गंगापूर येथील दोन्हीही बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.
बालविकास प्रकल्प क्र.1 अधिकारी खंदारे व क्र.2 च्या अधिकारी देशमुख हे दोघे कार्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. व त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. त्यांच्या गैरहजेरी कार्यालयीन अधीक्षक माळी मॅडम यांना आयटक युनियनच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेत कामासाठी गेलेले दोन्हीही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची फोनवरून कॉम्रेड प्रा. राम बाहेती यांनी चर्चा केली. त्यानंतर 3 तासानी आंदोलन मागे घेण्यात आले. आयटक युनियनचे अध्यक्ष कॉ.प्रा. राम बाहेती, कॉ.शीला साठे, कॉम्रेड विलास शेंगुळे, कॉम्रेड शन्नो शेख, कॉम्रेड शमीम शेख, कॉम्रेड सीमा व्यवहारे, कॉम्रेड चंचल खंडागळे, कॉम्रेड अश्विनी थोरात, कॉम्रेड सुमन प्रधान, कॉम्रेड छाया पोटे, कॉम्रेड भक्ती निकम, उज्वला मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी सविता शेळके, रोहिणी जाधव, पद्मा प्रधान, राजश्री खरात, शहनाज शेख, पल्लवी आव्हाड, मंगल जगधने, शिवकन्या पानझडे, गीतांजली वाकचौरे, सुनंदा अहिरे, कल्पना तायडे, भारती सुरडकर, आशा मालोसे, अनिता गवळी, यमुना पंडित, अश्विनी विटोरे, सुनंदा गवारे, आशा पारखे, मंगल घोगरे, रंजना मुळे, साधना दुशिंग या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
अशा आहेत प्रश्न व मागण्या –
अंगणवाडी सेविकांना एफआरएसच्या कामाच्या सध्या प्रचंड त्रास होत आहे. अनेकदा पती किंवा मुलगा किंवा इतर नातेवाईक यांच्या मोबाईलवरून काम करण्याची सक्ती केली जाते. तसेच मातृवंदनेचे काम प्रामुख्याने आशा कर्मचाऱ्यांचे असतानाही ही कामे करण्याची सक्ती आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. यामुळेही कामाच्या बोजा वाढलेला आहे. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुनरतपासणी करण्याचे काम देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यावर सोपवण्यात आलेले आहे. निवडणुकी संदर्भातील बीएलओची कामेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सक्तीने देण्यात येत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. असे आयटकने निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नाशिवाय पोषण आहाराचे, प्रवास भत्त्याचे, निवृतीनन्तर एकरकमी लाभाचे पैसे थकलेले आहेत याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, मंत्रालयावर धडक मोर्चा –
कामाच्या ओझ्याच्या निषेधार्थ व पेन्शन, वेतनवाढ यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने येत्या 8 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 9 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावर आयटकच्या लाखो कर्मचारी धडकणार आहे.
