February 5, 2026

गजाआडवाळूजमहानगर, (ता.14 )- चोरी केलेली रिक्षा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलीस आणि सापळा रचून रिक्षासह दोघांना ताब्यात घेऊन रिक्षा जप्त केली. ही कारवाई बुधवारी (ता.13) रोजी सायंकाळी वाळुज औद्योगिक वसाहतीत करण्यात आली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्टार हॉटेल पंढरपूर येथून शेख नजीर शेख गफ्फार रा. हमालवाडा रेल्वेस्टेशन छत्रपती संभाजीनगर त्यांची प्रवासी वाहतुक रिक्षा (एम एच 20, बी टी -9458) कोणीतरी अज्ञात चोरटयाने दहा डिसेंबर रोजी रात्री चोरून नेली होती. या गुन्हयाचा तपास करत असताना 13 डिसेंबर रोजी सपोनि. गौतम वावळे यांना गुप्त माहिती मिळाली की, एमआयडीसी वाळज मधील के 118 समोर दोन इसम चोरीची प्रवासी रिक्षा विक्री करण्यास येणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशात जाउन सापळा लावला असता तेथे दोन इसम एक काळे पिवळ्या रंगाची प्रवासी वाहतुक रिक्षा घेउन आले. त्याचवेळी झडप मारून रिक्षासह त्यांना ताब्यात घेतले. त्याचे नाव
  • अंकुश संजय आरोटे व मिलींद सोमीनाथ महापुर दोन्ही रा विटावा ता गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले. त्यांना रिक्षा मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी प्रथमता: उडव उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेउन विचारले असता त्यांनी पंढरपूर येथून सचिन नागरे याच्या मदतीने रिक्षा चोरीची कबूली दिली. त्यावरुन पोउपनि दिपक रोठे यांनी घटनास्थळी रिक्षाचा जप्ती पंचनामा करुन आरोपी अंकुश संजय आरोटे (23) व मिलींद सोमीनाथ महापुरे (26) दोन्ही रा विटावा ता गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर यांना रिक्षासह ताब्यात घेतले असुन आरोपी सचीन नागरे रा. विटावा याचा शोध सुरु आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *