February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.1) – भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण चिरडून जागीच ठार झाला. मात्र सुदैवाने एक जण बालंबाल बचावला. ही अपघाताची घटना बुधवारी (ता.1) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साठेनगर वाळूज येथील सुखदेव भाऊसाहेब गायकवाड (33) हा वाळुज औद्योगिक वसाहतीत मजुरीचे काम करतो. बुधवारी (ता.1) रोजी सकाळी सुखदेव हा कामाच्या शोधात होता. सुखदेव याने शेख शब्बीर शेख करीम (रा.अजवानगर, वाळूज) या दुचाकीस्वारास लिफ्ट मागितल्याने शेख शब्बीर व सुखदेव गायकवाड हे दुचाकी ( एम.एच.20, ए.आर.-5199) वरून जात होते. कामगार चौकात सकाळी 11 वाजेच्या सुमारास भरधाव आलेल्या विना नंबरच्या हायवा ट्रकच्या चालकाने शेख शब्बीर याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शेख शब्बीर हा दूर फेकला गेला तर सुखदेव गायकवाड हा कंटनेरच्या चाकाखाली सापडला.

ट्रकचे चाक सुखदेव गायकवाड याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा घटनास्थळीच तडफडून मृत्यु झाला. तर शेख शब्बीर हा जखमी झाला. या अपघाताची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, उपनिरीक्षक पुंडलिक डाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ भाव घेत सुखदेव गायकवाड याचा मृतदेह घाटीत पाठविला. जखमी शेख शब्बीर याच्यावर पंढरपूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *