March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.14) – इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई यांच्या मार्फत 4 ते 7 डिसेंबर 2023 या दरम्यान आय.आय.टी. मुंबई येथे आयसीडब्लूटी-2023 (इंटरनॅशनल कॉनफरन्स ऑन वॉटर टेक्नालॉजी या जागतिक स्तरावरील परिषदेत बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाला आदर्श संशोधनासाठी उत्कृष्ट पाणी तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या जागतिक परिषदेत प्रमुख पाहुणे इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी वि‌द्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. पंडित व आयआयटी. मुंबई येथील डॉ. शोभा शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेमध्ये पाण्याचे नमुने गोळा करणे आणि पाणि संशोधनाशी संबंधित ग्रामीण भागात फिल्ड वर्क करण्यासाठी केलेल्या स्तुत्य प्रयत्नांची आणि उल्लेखनीय कार्याची श्रोत्यांनी प्रशंसा केली. डॉ. प्रदीप भलगे, डॉ. गितांजली कौशीक, प्रा. रियाजुददीन सिध्दीकी, प्रा. कल्याणी कोंडेकर, प्रा कैलास चरखा आणि प्रा. ऋषिकेश आहेर या सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील प्राध्यापकांनी ग्रामीण जल व्यवस्थापणातील विविध समस्या व त्यावरील उपाय मांडले. या केलेल्या संशोधनाच्या कार्याबददल इंटरनॅशनल कॉनफरन्स ऑन वॉटर टेक्नालॉजी या जागतिक परिषदेच्या वतीने बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाला आदर्श संशोधनासाठी उत्कृष्ट पाणी तंत्रज्ञानामधील योगदाना बद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच या परिषदेमध्ये डॉ. प्रदीप भलगे यांना स्प्रिंजर नेचर या जग प्रसिध्द संस्थेने सर्वोत्कृष्ट संशोधन आणि सादरीकरण हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. आणि त्यांच्या प्रस्तुत कार्यास जागतिक ओळख मिळवून दिली. या आय सी डब्लू टी-2023 जागतिक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य गोंविद एस. ढगे, मॅकेनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे आणि सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील प्राध्यापक उपस्थित होते.
या मिळालेल्या पुरस्काराबददल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी हायटेक अभियांत्रिकीचे कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पी. पिंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन के. भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *