
वाळूजमहानगर, (ता.11) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांच्या मागदर्शनाखाली जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. मधुश्री सावजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. मधुश्री सावजी, प्रा. गोविंद ढगे, तसेच महाविद्यालयातील योगेश्वरी रांझेकर, जान्हवी वावरे व क्वाझी अक्सा या विद्यार्थिनीनी आपले मनोगत व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये कराटे सेल्फ डिफेन्स हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात दामिनी पथकाच्या पियंका सरनाईक, धनश्री जाधव, संकेत पवार यांनी प्रशिक्षण दिले. तसेच पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला निंभोरे हेड कॉन्टेबल, दामिनी पथक पोलिस प्रशासनाकडून विविध उपक्रमाबाबत जनजागृती विषयावर माहिती दिली. रुपा साखला यांनी सायबर क्राईम मोबाईलपासून होणारे दुष्परिणाम बाबत जनजागृती केली. यावेळी रांगोळी स्पर्धा, प्राध्यापकासाठी योगा शिबीर, तसेच महिला सक्षमिकरणावर एक लघु चित्रपट दाखविण्यात आला. कार्यक्रमास हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, प्रा. अमोल अडकिणे, प्रा. आर. एफ. सिध्दीकी, प्रा. प्रताप मोहिते, प्रा. संदिप इंगळे, प्रा. भावना पिंगळे, प्रा. जनार्धन भोर, प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कैलास अतकरे यांनी तर आभार डॉ. भावना पिंगळे यांनी मानले.
