वाळूजमहानगर, (ता.22) – बजाजनगर येथील हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयात गुरुवारी (ता.20) फेब्रुवारी रोजी एक्सेलआर कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राइव्हमध्ये महाविद्यालयातील डिगांबर लोहार, अमन सय्यद, वैष्णवी शिंदे या विद्यार्थ्यांची फुलस्टॅक डेव्हलपर म्हणून निवड झाली.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांनी विशेष अभिनंदन केले. या कॅम्पस् ड्राइव्हसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय शिराळे व प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव तसेच एक्सेलआर कंपनीचे व्यवस्थापक रिझवान शेख यांची उपस्थिती होती. या कॅम्पस् ड्राईव्ह कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बीसीएस विभागप्रमुख प्रा. वर्षा गोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. एस. एन त्रिभुवन, प्रा. बी.ए तायडे, डॉ. एम.यु. मोरे, प्रा. एन.जी. खरात, प्रा. पिंजारी, प्रा. कुलकणी, प्रा. भुसारे, प्रा. छडीकर यांची उपस्थिती होती.