March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.23)- बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात 12 एप्रिल 3025 रोजी ‘दुडिप टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगच्या शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी तसेच छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजि. च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या कु. दिपाली कुलकर्णी या विद्यार्थिनीची ग्रैजुएट ट्रेनी डिजीटल डेव्हलोपमेंट रोल म्हणून करण्यात आली.

दिपाली कुलकर्णी हीला वार्षिक पॅकेज 4 लाख रुपये कंपनीकडुन दिले जाणार आहे. तिच्या या यशाबददल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव अमन जाधव यांनी कु. दिपाली कुलकर्णीचे कौतुक केले असून तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद एस. ढगे, आणि हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अमोल एस. अडकिणे, सिव्हील विभागचे विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रताप एम. मोहिते, सीएसईएआयएमएल विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदिप ई. इंगळे, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख प्रा. भावना पी. पिंगळे, ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे विभागप्रमुख प्रा. जनार्धन के. भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव, आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कु. दिपाली कुलकर्णीचे स्वागत केले. तसेच ट्रेनिग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे विभागप्रमुख प्रा. जनार्धन के. भोर आणि त्याचे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *