March 24, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील टॉपर्स कोचिंग क्लासेसच्या निंदनिय घटनेच्या निषेधार्थ व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट येथे काळ्या फिती हाताला बांधून सोमवारी 16 जून रोजी निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रमोद धुळे यांनी या घटनेबद्दल शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या जाधव नावाच्या इसमाला पोक्सो कायद्यांतर्गत कठोरातकठोर कार्यवाही करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे. आणि जन्म ठेपेची किंवा फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी तीव्र निषेध प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलींच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी कटीबद्ध आहोत आणि पालक शिक्षक व विद्यार्थी यांची प्रत्येक शाळा क्लास महाविद्यालयात महिन्यातून एकदा तरी चर्चा सत्र किंवा संवाद झाला पाहिजे. या अनुषंगाने सर्व संचालक व शिक्षक यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ लुटे यांनी या घडलेल्या घटनेबद्दल प्रत्यक्ष दर्शी माहिती देऊन खाजगी क्लासेस चालविणाऱ्या व तेथे शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे चरित्र पडताळणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली पाहिजे. असे यावेळी मत व्यक्त केले. यावेळी पूनम सोनवणे, अनिता कदम, प्रीती राठोड, प्रीती ढगे, पल्लवी देशमुख याची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *