March 26, 2026


वाळूजमहानगर, ता.14 (बातमीदार) – बजाजनगर येथील स्वर्गीय भैरोमल तनवानी विद्यालयात
प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन
तसेच भव्य आयुर्वेद उपचार व निदान प्रसिद्ध वैद्य चिखलदरा मेळघाट येथील वेदांत शूरपाटणे यांच्या शिबिराचे आयोजन 12 जून 2023 रोजी करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकाना मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता घेण्यात आलेल्या या शिबिरात प्राध्यापक गणेश शिंदे व आयुर्वेद तज्ञ वेदांत स्वरूपाटणे यांनी सखोल मार्गदर्शन करून निरोगी राहण्याचा सल्ला दिला. या शिबिराचा विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

या आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन उद्योजक अर्जुन आदमाने व उद्योजक हनुमान भोंडवे यांनी केले होते. दीर्घ आजारी असणाऱ्या कामगार बंधूना व त्यांच्या परिवाराला ऐलोप्याथीक खर्च न परवडत असल्यामुळे या आजारावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक वैद्यराज वेदान्त शुरपाटणे यांना अमरावती हुन पाचारण करण्यात आले व हें शिबीर घेण्यात आले असल्याचे उद्योजक हनुमान भोंडवे व अर्जुन आदमाने यांनी सांगितले. या वेळी उद्योजक हनुमान भोंडवे, संस्थेचे पदाधिकारी विजय उखळे, पंडीत नवले, राजेंद्र माने, अशोक लगड मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, दिगंबर आंबेकर यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *