March 25, 2026


वाळुज महानगर, (ता.14)- आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, जो तो व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा सर्रास वापर करतो. मात्र तो करताना जपून करावा. असे अवाहन दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक लता जाधव यांनी श्री गजानन विद्या मंदिरात केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थिनी, महिला व विद्यार्थ्यांना सोशल मिडियाचा वापर, पालक व मुले संवादाची कमी, पालन पोषण, अवांतर वाचन, आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.

रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या सयुक्त विद्यमानाने शाळेत जागतिक महिला दिन व कोरोना काळात समाज कार्य करणाऱ्यांचा स्वागत समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वाती राऊत, दामिनी पथक प्रमुख लता जाधव, सामाजिक कार्यकर्त्या लता ठोंबरे, अनिता खैरे, पालक प्रतिनिधि सरिता देशमुख, विद्या जाधव, राधा लोहार, शीतल मेंढे, आरोग्य सेविका छाया वर्घे, रूपाली आदापुरे, ज्योती भोसले, संस्थेचे सचिव हरिष जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्राथमिक विभाग प्रमुख कल्याण कुलकर्णी, मनीषा नवथर, माध्यमिक विभाग प्रमुख संजय तुपे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ, रेखा बिदरकर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी व रांजणगाव (शे.पुं) व जोगेश्वरी येथील आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्या व आशा वर्कर यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या व शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील प्रथमेश मुटकुळे, ऋतुजा वाघमारे, शिवानी तारडे, श्रुती कापसे, आदित्य कांबळे, सूशांत मामीलवाड या विद्यार्थ्यांना मॅथ ऑलपियाडमध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पालकांसमवेत गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देवून प्रमुख पाहुण्यांद्वारे सत्कार करण्यात आला.
तसेच शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे अशोक तारडे यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लता जाधव यांनी महिला सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा नवथर तर आभार मष्णाजी शिनगारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर गीते, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, अश्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, छाया वाघदरे, निकिता देशमुख, जयश्री पाटील, दिपक कोळी, दिपक पठारे, पूजा गिरी, जबार पठाण, विनय अवसरमल, विनायक वाघमारे, लता वैष्णव, सोनी कुमारी, पूजा खोतकर, अस्मिता तायडे , विजया पवार, हर्षदा भुंबे, अर्चना बुर्जे, प्रिती नरवाडे, पूजा ठाकूर, तेजेराव तलवारे, प्रल्हाद मंगनाळे आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *