March 27, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – रात्रपाळीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या 54 वर्षीय इसमाचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याचे शनिवारी (ता. 1) रोजी सकाळी उघडकीस आले. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका निर्माणाधीन कंपनीत घडली.

बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील बुश इलेक्ट्रिकल या कंपनीचे बांधकाम सुरू आहे. या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून वाळूज परिसरातील आंबेगाव (वाडी) येथील भाऊसाहेब बनकर वय 54 हे दिशा सर्व्हिसेस या सिक्युरिटी कंपनीमार्फत
काम करत होते. बनकर यांच्यासोबत गुलाबराव चव्हाण हे सुद्धा बांधकामाच्या देखरेखीसाठी होते. शुक्रवारी (ता.28) रोजी सायंकाळी भाऊसाहेब बनकर हे कंपनीत ड्युटीवर आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.1) रोजी सकाळी 7 वाजले तरी भाऊसाहेब बनकर हे कंपनीतून बाहेर न आल्याने गुलाबराव यांनी बाजूच्या कंपनीत राहणाऱ्या मुलाला भाऊसाहेब हे अद्याप कंपनीतून बाहेर आले नाही, असे सांगितले. त्यामुळे करणसिंग याने कंपनीत जाऊन पाहिले असता भाऊसाहेब बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत भाऊसाहेब यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेऊन करण्यात आली. बनकर यांच्या या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे वाळूज औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *