March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.7) – सिडको महानगर -1 येथील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणेश उत्सव मंडळाने बुधवार 4 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल व समता फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 64 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येईल. अशी माहिती या हॉस्पिटलच्या योगिता अन्नदाते, शिवानंद महालिंगे यांनी दिली.
या रक्तदान शिबिरात आदर्श ब्लड बँक च्या डॉ.अनुराधा नांद्रे, राम डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलन केले. गणेशोत्सव मंडळातर्फे गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रमाता जिजाऊ चौक, सिडको महानगर -1 येथे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उत्सव यशस्वितेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुट्टे, समिती अध्यक्ष तेजस बढे, संदीप सानप, सचिव सुदाम जाधव, कोषाध्यक्ष करण यकळकर, उपाध्यक्ष रामदास सपकाळ, जगदीश उगले, प्रवीण हांडे, काकासाहेब सुलताने, ज्ञानेश्वर म्हस्के, कार्याध्यक्ष कृष्णा बागुल, अमोल वाघ, अविनाश निकम, दीपक वीर, रामेश्वर हिवाळे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व गणेश भक्तांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *