
वाळूजमहानगर, (ता.3) – सिटू या कामगार संघटनेच्या वतीने बजाजनगर येथून कामगार चौकापर्यंत दुचाकी रॅली काढून कामगार पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा नारा देत कॉम्प्लेट अजय भवलकर, लक्ष्मण साक्रूडकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी मनोहर सनेर, विलास वंजारे, सतीश कुलकर्णी, नागनाथ बडे, शंकर नन्नुरे, छगन भालेराव, रामदास ठेंग, राजू फटांगडे आदिसह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
